
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मंगळवारी हरयाणा येथील एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलीच्या लग्नात वऱहाडी बनून हजेरी लावली. तेथे त्यांनी या कुटुंबासोबत जेवण केले. गप्पा मारल्या आणि खास हरयाणवी पगडीही घातली. सामान्यांशी नाते जोडण्याच्या त्यांच्या या स्वभावाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

























































