भाजप-अजित पवार गटाचं ठरलं; शिंदे गटाला कात्रजचा घाट दाखवणार, रायगड झेडपीच्या अध्यक्षपद निवडणुकीमध्ये राजकीय वर्तुळाचे लक्ष, गुरुवारी काय घडणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी १२ मार्च रोजी होणार आहे. गटाचं ठरलं असून शिंदे गटाला थेट त्यापूर्वीच भाजप व अजित कात्रजचा घाट दाखवण्यात येणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला सोबत घेऊन भाजप आपला अध्यक्ष विराजमान करणार असून या निवडणुकीकडे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक २१ जागा जिंकूनही शिंदे गटाला सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे. राज्यात एकत्र सत्तेत असलेल्या भाजपने शिंदे गटाला जिल्हा परिषदेमध्ये मात्र सत्तेपासून रोखल्याने रायगडात दोघांमधील संघर्ष शिगेला पोहोचण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्हा परिषदेमध्ये एकूण ५९ सदस्य आहेत. त्यापैकी भाजपला १५, राष्ट्रवादी अजित पवार पवार गटाला १६, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला ५, शिंदे गटाला २१ तर काँग्रेसला दोन जागा मिळाल्या. या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. मात्र निवडणूक पूर्व युती असल्याने भाजप व अजित पवार गटाने बहुमताचा आकडा गाठला. त्यामुळे दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे गट दुखावल्याने गुरुवारी होणाऱ्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • शिंदे गटाला सर्वाधिक २१ जागा मिळाल्याने त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी झेडपीतील सत्तेत सहभागी होण्यासाठी प्रयत्न केले. शिंदे गटाच्या रायगडातील आमदारांनी तर त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली.
  • रायगडातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची जय्यत तयारी केली असून अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर विजयी मेळाव्याचे आयोजनही केले आहे. मात्र जास्त जागा मिळूनही शिंदे गट अस्वस्थ असल्याचे दिसून आले आहे.
  • रायगड जिल्हा परिषदेमध्ये महायुती म्हणून सत्तेचे समीकरण जुळवून आणावे असा प्रस्ताव मांडण्यात आला. वरिष्ठ पातळीवर बैठकाही पार पडल्या. पण शिंदे गटाला हाती काहीही लागले नाही.

नेमके घोडे कुठे अडले?

रायगड जिल्हा परिषदेत महायुती म्हणून आपण सत्ता स्थापन करू, असा प्रस्ताव वरिष्ठांकडे दिला होता. पण शिंदे गटाला सोबत घेण्यास अनेक जण इच्छुक नाहीत. दक्षिण रायगडात भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गटाची निवडणूकपूर्व युती होती. कर्जत-खालापूरमध्ये मात्र शिंदे गट व भाजप एकत्र ल ढले. पण तेथे अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही. गेल्या अनेक दिवसांपासून शिंदे गट व अजित पवार गटामध्ये पाल कमंत्री पदावरून वाद सुरू आहे. आता जिल्हा परिषदेमध्ये भाजपने शिंदे गटाला दूर ठेवल्याने हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.