
उन्हाळ्यात शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता वाढते. अशावेळी आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी तळपायंना मसाज करणे हा एक उत्तम पर्याय आहे. दिवसभर उन्हात फिरण्यामुळे अंगाची लाही लाही होते. याचा त्रास डोळ्यांनाही होतो. डोळ्यांची जळजळ उन्हाळ्यात फार मोठ्या प्रमाणात होते. तसेच उन्हामुळे आपल्या पायांनाही मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच उन्हाळ्यात पायांची निगा राखणं हे खूप गरजेचे आहे.
दिवसभराच्या थकव्यामुळे अनेकदा स्नायू दुखतात. अशा परिस्थितीत, यापासून आराम मिळवण्यासाठी, आपण दररोज पायांची मालिश करू शकता. स्नायूंच्या दुखण्यापासून आराम मिळेल. तसेच तुम्हाला आराम वाटेल. पायाला मसाज केल्याने स्नायू सक्रिय होतात.
उन्हाळ्यात पायांना मोहरीच्या तेलाने मालिश करण्याचेही खूप फायदे होतात. मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे तणावही दूर होतो. हलक्या सूर्यप्रकाशात मोहरीच्या तेलाने मसाज केल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळतो.
उन्हाळ्याच्या दिवसात ऑलिव्ह ऑईलचा वापर केल्याने पाय दुखण्यापासून आराम मिळतो. त्याच वेळी, तणाव दूर होतो. ऑलिव्ह ऑइल हलके कोमट करून मसाज करावे. पायांना मसाज करण्यासाठी हे तेल खूप फायदेशीर आहे.
उन्हाळ्यात पायांच्या मसाज दरम्यान, तळवे देखील मालिश केले जातात, यामुळे घोट्याच्या दुखण्यापासून आराम मिळतो.
40 वर्षांनंतर, स्त्रियांना अनेकदा घोट्याच्या आणि पायांच्या दुखण्याने त्रास होतो. अशावेळी घोट्याच्या दुखण्याने त्रस्त असाल तर पायाचा मसाज तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. रोज रात्री झोपताना पायाची मालिश करावी. यामुळे दुखण्यात आराम मिळेल.
उन्हाळ्यात पायांना मसाज केल्याने रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे नसा आराम होतो आणि घोट्याच्या वेदना कमी होतात.
उन्हाळ्यामध्ये पीरियड्स येतात तेव्हा शरीरातील उष्णता ही अधिक वाढते. अशा स्थितीत पायांना मसाज करून मासिक पाळीच्या दुखण्यापासून आराम मिळू शकतो. पायांना मसाज केल्याने मासिक पाळीच्या दरम्यान मूड स्विंगपासूनही आराम मिळतो, तसेच थकवाही कमी होतो.
उन्हाळ्यात रात्रीची झोप येत नाही, अशावेळी रोज रात्री पायाला तेलाने मसाज केल्यामुळे, शरीराचा थकवा आणि तणाव दोन्ही दूर होतील आणि चांगली झोपही लागेल.



























































