IPL 2026 चा बिगुल वाजला; पहिल्या 20 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर, वानखेडेवर भिडणार रोहित-विराट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसी टी-20 वर्ल्डकप संपताच क्रीडा प्रेमींना इंडियन प्रीमियर लीगचे वेध लागले. बीसीसीआयनेही चाहत्यांची उत्कंठा ताणून न धरता आगामी हंगामाचे वेळापत्रक जाहीर केले. आयपीएलचा पहिला सामना बंगळुरुतील एम. चिन्नास्वामी मैदानावर गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद संघात 28 मार्च रोजी खेळला जाईल. आसाम, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असल्याने बीसीसीआयने पहिल्या 16 दिवसांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या काळात एकूण 20 सामने खेळले जातील.

IPL 2026 वेळापत्रक (पहिले 20 सामने)

1. 28 मार्च (शनिवार), संध्याकाळ: RCB vs SRH – बेंगळुरू
2. 29 मार्च (रविवार), संध्याकाळ: MI vs KKR – मुंबई
3. 30 मार्च (सोमवार), संध्याकाळ: RR vs CSK – गुवाहाटी
4. 31 मार्च (मंगळवार), संध्याकाळ: PBKS vs GT – मुल्लानपूर
5. 1 एप्रिल (बुधवार), संध्याकाळ: LSG vs DC – लखनऊ
6. 2 एप्रिल (गुरुवार), संध्याकाळ: KKR vs SRH – कोलकाता
7. 3 एप्रिल (शुक्रवार), संध्याकाळ: CSK vs PBKS – चेन्नई
8. 4 एप्रिल (शनिवार), दुपार: DC vs MI – दिल्ली
9. 4 एप्रिल (शनिवार), संध्याकाळ: GT vs RR – अहमदाबाद
10. 5 एप्रिल (रविवार), दुपार: SRH vs LSG – हैदराबाद
11. 5 एप्रिल (रविवार), संध्याकाळ: RCB vs CSK – बेंगळुरू
12. 6 एप्रिल (सोमवार), संध्याकाळ: KKR vs PBKS – कोलकाता
13. 7 एप्रिल (मंगळवार), संध्याकाळ: RR vs MI – गुवाहाटी
14. 8 एप्रिल (बुधवार), संध्याकाळ: DC vs GT – दिल्ली
15. 9 एप्रिल (गुरुवार), संध्याकाळ: KKR vs LSG – कोलकाता
16. 10 एप्रिल (शुक्रवार), संध्याकाळ: RR vs RCB – गुवाहाटी
17. 11 एप्रिल (शनिवार), दुपार: PBKS vs SRH – मुल्लानपूर
18. 11 एप्रिल (शनिवार), संध्याकाळ: CSK vs DC – चेन्नई
19. 12 एप्रिल (रविवार), दुपार: LSG vs GT – लखनऊ
20. 12 एप्रिल (रविवार), संध्याकाळ: MI vs RCB – मुंबई

वानखेडेवर रोहित विराट भिडणार

पहिल्या 16 दिवसात मुंबईतील वानखेडे मैदानावर दोन लढती होणार आहेत. पहिली लढत 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समध्ये होईल. तर दुसरी लढत 12 एप्रिल रोजी मुंबई विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात होईल. ही लढत क्रीडा प्रेमींसाठी पर्वणी असणार आहे. या लढतीत रोहित शर्मा आणि विराट कोहली एकमेकांविरुद्ध खेळताना दिसतील.

सामन्याच्या वेळा

दरम्यान, दुपारचे सामने हिंदुस्थानी वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होतील. तर संध्याकाळचे सामने: भारतीय वेळेनुसार रात्री 7.30 वाजता सुरू होतील. निवडणुकांमुळे बीसीसीआयने (BCCI) सध्या केवळ पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर केले आहे.