नामदेव जगताप यांचे निधन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालघर येथील रहिवाशी नामदेव जगताप यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे वय 71 वर्षे होते. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. दैनिक ‘सामना’चे पालघर जिल्हा प्रतिनिधी सचिन जगताप यांचे ते वडील होत.

मूळचे कोल्हापूर जिह्यातील भुदरगड येथील रहिवाशी असलेल्या नामदेव जगताप यांनी मुंबईत गिरणी कामगार म्हणून काम केल्यानंतर दुग्धव्यवसाय विभाग पालघर तसेच एसटी महामंडळातही दीर्घ काळ सेवा केली. त्यांच्या पार्थिवावर डुंगीपाडा येथील वैकुंठभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.