
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या अत्यंत लोकप्रिय विनोदी कार्यक्रमातून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री ईशा डे हिने आयुष्याच्या नवीन इनिंगला सुरुवात केली आहे. ईशा गुरुवारी अभिषेक खणकर याच्यासोबत विवाहबंधनात अडकली असून त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आले आहेत. या खास सोहळ्यासाठी ईशाने पारंपारिक लाल रंगाची नऊवारी साडी परिधान केली होती, ज्यामध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून दिसत होते. तर तिचा जोडीदार अभिषेकने मेहंदी रंगाचा कुर्ता आणि धोतर असा साजेसा पेहराव केला होता. या विवाह सोहळ्याला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ मधील तिच्या अनेक सहकलाकारांनी हजेरी लावून नवदाम्पत्याला शुभेच्छा दिल्या.


























































