देशात गॅस-इंधनाची कमतरता नाही, पेट्रोलियम मंत्र्यांची माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्यपूर्वेतील इराण-इस्रायल-अमेरिका युद्धामुळे हिंदुस्थानात एलपीजी (LPG) सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यावरच स्पष्टीकरण देताना लोकसभेत केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी म्हणाले आहेत की, “हिंदुस्थानात इंधन किंवा गॅसची कोणतीही कमतरता नाही. केवळ भीतीपोटी सिलिंडरची मागणी वाढल्याने काही ठिकाणी टंचाई भासत आहे.”

केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी या परिस्थितीवर भाष्य करताना सांगितले की, सरकारने अल्टरनेट फ्युएल चॅनेल्स (पर्यायी इंधन मार्ग) सक्रिय केले आहेत. युद्धामुळे होर्मुज सामुद्रधुनीतील वाहतुकीवर परिणाम झाला असला तरी, हिंदुस्थानने इतर देशांशी चर्चा करून आपली पुरवठा साखळी सुरक्षित केली आहे. नागरिकांनी घाबरून जाऊन गरजेपेक्षा जास्त सिलिंडर बुक करू नयेत, असे आवाहनही सरकारने केले आहे.”

युद्धामुळे गॅस मिळणार नाही, या भीतीने अनेक ग्राहकांनी एकाच वेळी सिलिंडर बुकिंग सुरू केल्याने स्थानिक वितरकांकडे काही प्रमाणात भार वाढला आहे. ही टंचाई नैसर्गिक नसून मानवनिर्मित पॅनिकमुळे असल्याचे सरकारने म्हटले आहे.