
बॉलीवूडचा किंग अशी ओळख असलेला शाहरुख खानने पुन्हा एकदा हुरून ग्लोबल रिच लिस्टमध्ये स्थान मिळवले आहे. या यादीत शाहरुख हिंदुस्थानातील सर्वात श्रीमंत अभिनेता ठरला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा शाहरुखला झटका बसला आहे. शाहरुखच्या संपत्ती 1 हजार 690 कोटी रुपयांची घसरण झाली आहे. शाहरुखची संपत्ती 1.3 बिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 10 हजार 800 कोटी रुपये आहे.
हुरून ग्लोबल रिच लिस्ट नुकतीच जारी करण्यात आली आहे. या लिस्टमध्ये हिंदुस्थानातील 308 बिलिनेयरच्या नावांचा समावेश करण्यात आला आहे. चीनकडे 1110 अब्जाधीश असल्याने चीन पहिल्या स्थानावर, तर अमेरिकेत 1 हजार अब्जाधीश असल्याने दुसरे स्थान पटकावले आहे. 2025 मध्ये शाहरुख जगातील सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी होता. त्याची संपत्ती 12,490 कोटी इतकी होती, परंतु यंदा त्याची नेटवर्थ 1.3 बिलियन डॉलर आहे. शाहरुखच्या संपत्तीत 1690 कोटी रुपयांची घसरण झाली आहे. सेलिब्रिटीजच्या यादीत पहिल्या स्थानावर म्युझिकचा आयकॉन जे झेड आहे. त्याची संपत्ती 25,828 कोटी रुपये आहे.




























































