
अजितदादांच्या अपघाताबाबतची खरी माहिती सर्वांसमोर आली पाहिजे ही आमची भूमिका आहे. पत्रकार परिषद घेण्याबाबत माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. पुढच्या आठवडय़ात मी अजितदादांच्या अपघाताबाबत पत्रकार परिषद घेऊन माझ्या मनातील गोष्टी बोलणार असल्याचे जय पवार यांनी आज स्पष्ट केले.
‘माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. पण मला स्वतःला काही माहिती पाहिजे. कारण सर्वांच्या समोर येऊन नुसतं बोलून काय फायदा? आपल्याला खरी माहिती पाहिजे. तथ्य सर्वांसमोर यायला पाहिजे. त्यामुळे आम्ही सर्वांनी विचारपूर्वक पत्रकार परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. आज अजित पवार असते तर त्यांनीदेखील एखाद्या विषयाची संपूर्ण माहिती घेऊनच पत्रकार परिषद घेतली असती, तसं माझेदेखील तेच विचार आहेत’, असं जय पवार म्हणाले.




























































