वृद्ध आणि निराधारांचा आधार नारायणचंद्र ट्रस्टचा रौप्यमहोत्सव थाटात साजरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वसई-विरार महापालिका क्षेत्रात गेली 25 वर्षे सामाजिक कार्य करणाऱया नारायणचंद्र ट्रस्ट या संस्थेचा रौप्यमहोत्सव नुकताच पार पडला. या वेळी महिला दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या मीना सराटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

संस्थेच्या माध्यमातून वसई-विरार परिसरातील हजारो निराधार मुला-मुलींचे तसेच वृद्ध आणि महिलांचे जीवनमान उंचावले आहे. संस्थेचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध मालपाणी आणि डॉ. अंजली मालपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत रौप्यमहोत्सवी कार्यक्रम झाला. संस्थेचे संचालक विजय सराटे यांनी डॉ. मालपाणी यांचा सत्कार केला. या वेळी अनाथ मुले, निराधार वृद्ध आणि महिलांसाठी अनेक वर्षे काम करणाऱया शारदा माता विद्याश्रम न्यास – विरार, प्रणब कन्यासंघ – नालासोपारा, स्वामी विवेकानंद – नालासोपारा, आशा अंकुर – वसई, लिबनिया निकेतन – वसई आदी सेवाभावी संस्थांचा सत्कार करण्यात आला.

या वेळी वसई कला क्रीडा महोत्सवाचे अध्यक्ष दत्ताराम मणेरीकर, युसूफ मेहरली सेंटर मुंबईचे बाळकृष्ण सावंत, मानसोपचारतज्ञ डॉ. सुरेश पाटील, ज्येष्ठ पत्रकार युवराज मोहिते, मुंबई महापालिकेच्या विभा जाधव आदी उपस्थित होते. दिनेश कोयताडे यांनी सूत्रसंचालन केले.