
इराणचे सर्वोच्च नेते आयातोल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूवरून काँग्रेस नेते जयराम रमेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. खामेनेई यांच्या मृत्यूचा निषेध किंवा प्रतिक्रिया देण्याबाबत पंतप्रधानांनी संकोच का दाखवला, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
जयराम रमेश यांनी यापूर्वी केलेल्या “तडजोड केलेले पंतप्रधान” या आरोपाचीही आठवण करून दिली. पंतप्रधान मोदी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू या आपल्या ‘मित्रांना’ नाराज करू इच्छित नसल्यामुळेच ते शांत आहेत, असा आरोप त्यांनी केला. एक्स या समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमध्ये जयराम रमेश यांनी लिहिले, “आता हा संकोच का? तडजोड केलेले पंतप्रधान आपल्या अमेरिकन आणि इस्रायली ‘मित्रांना’ नाराज करू इच्छित नाहीत.”
खामेनेई यांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान मोदी आणि परराष्ट्र मंत्रालयाकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, यावरही जयराम रमेश यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
Ayatollah Khamenei, the constitutional head of state in Iran, was assassinated on Feb 28 2026 by the US and Israel. The PM is silent. The EAM is silent. Parliament is yet to have an obituary reference.
India has rightly condemned Iran’s attacks on Gulf states but is completely…
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) March 13, 2026

























































