Election Commission of India – पाच राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले; निवडणूक आयोगाची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केंद्रीय निवडणूक आयोग नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेत आसाम, केरळ, पद्दुचेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल येथील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली आहे. या राज्यांच्या विधानसभेचा कार्यकाळ मे-जूनमध्ये संपत आहे. पश्चिम बंगालमध्ये निवडणुका दोन टप्प्यात होणार आहे. तर इतर चार राज्यात एका टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पाचही राज्यांची मतमोजणी 4 मे राजी होणार आहे.

आसाममध्ये ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात निवडणूक होईल आणि ४ मे रोजी निकाल येतील. केरळमध्ये ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात निवडणूक होईल आणि ४ मे रोजी निकाल येतील. पुद्दुचेरीमध्ये ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात निवडणूक होईल आणि ४ मे रोजी निकाल येतील. बंगालमध्ये २३ आणि २९ एप्रिल रोजी दोन टप्प्यात मतदान होईल, ४ मे रोजी मतमोजणी होईल. तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल आणि ४ मे रोजी मतमोजणी होईल. गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, महाराष्ट्र येथील विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणाही आयोगाने केली.

निवडणुका होणाऱ्या सर्व राज्यांचा आयोगाने आढावा घेतला आहे. निवडणुका निःपक्ष आणि पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सर्व मतदारांनी त्यांचा मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन निवडणूक आयोगाने केले आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी या राज्यांमध्ये मतदार याद्यांचे विशेष पुनर्निरीक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.

मतदान संपल्यानंतर दोन तासात मतदानाची टक्केवारी जारी करण्यात येणार आहे. तसेच निवडणुकीबाबतची सर्व माहिती एका अॅपवर मिळणार आहे. अफवा आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येणार, असे ज्ञानेश कुमार यांनी स्पष्ट केले.