
अमेरिका-इस्रायल-इराण युद्धाचा 16 वा दिवस आहे. इराणचे युद्ध फार काळ लांबणार नाही, इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांच्या निधनानंतर इराण शरणागची पत्करेल, अशी अमेरिका आणि इस्रायलची अपेक्षा होती. मात्र, इराणने या दोन्ही देशांना जशासतसे उत्तर दिले आहे. इस्रायलमध्येही इराणच्या क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने विध्वंस केला आहे. तसेच 16 दिवस सुरू असलेल्या या युद्धाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पही जेरीस आले आहे. हे युद्ध किती काळ चालेल, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. तसेच जागतिक तेलपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी त्यांना जगाची विनवणी करावी लागत आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे की होर्मुझची सामुद्रधुनी खुली आणि सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक देश युद्धनौका पाठवण्यात अमेरिकेसोबत सामील होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. जागतिक तेलपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी त्यांनी चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि ब्रिटनलाही या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन केले आहे. होर्मुझची सामुद्रधुनीतून सुरळीत वाहतुकीसाठी अनेक देशांनी सहकार्य करावे आणि प्रभावित देशांनी त्यांची जहाजे या प्रदेशात पाठवावीत. आमच्या हल्ल्यांनंतर इराणची लष्करी क्षमता जवळजवळ नष्ट झाली आहे.
अमेरिकन नेव्ही तैनात करतो, 20 पट मोठा हल्ला करू अशा वल्गना करूनही इराणने ट्रम्प यांच्या धमक्यांना भीक घातली नव्हती. त्यामुळे ट्रम्प यांना आता मित्रांकडे मदतीसाठी विनंती करावी लागली आहे. आता जगात इंधनाची वाहतूक ठप्प झाल्यानंतर ट्रम्प यांना मित्रराष्ट्रांची आठवण झाली आहे. तेलाची वाहतूक सुरळीत होण्यासाठी ट्रम्प यांना आता मित्रांकडे मदतीसाठी विनंती करावी लागली आहे. तर इराणने अमेरिकेवर पलटवार करत मित्र देशांना होर्मुझ अडथळा करणार नसल्याचे सांगताना अमेरिका आणि इस्त्रायलची कोंडी केली आहे.



























































