Israel Iran War – युद्धाच्या सोने-चांदीलाही झळा; आठवड्यात झाली मोठी घसरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका, इस्रायल-इराण युद्ध 28 फेब्रुवारीला सुरू झाले. त्यानंतर 2 मार्चला सोने-चांदीच्या दराने मोठी झेप घेतली होती. त्यानंतर त्याच दिवशी त्यात मोठी घसरण झाली आणि ते मूळच्याच किमतीवर स्थिरावले. जागतिक अशांतता किंवा युद्धजन्य परिस्थितीत सुरक्षित गुंतवणूक म्हणून अनेकजण सोन्याकडे वळतात. मात्र, यावेळी तसे झालेले नाही. त्यामुळे गुंतवणूकदार संभ्रमात आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार होत आहेत. इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावामुळे जागतिक बाजारपेठेत चढ-उतार निर्माण झाला असून, याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवरही होत आहे. मात्र, या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर या आठवड्यात सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे या युद्धाच्या झळा सोने-चांदीच्या किमतीलाही बसल्या असून त्यात मोठी घसरण झाली आहे.

गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात सोन्या-चांदीच्या किमती लक्षणीय कमी झाल्या आहेत. ६ मार्च २०२६ रोजी सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १,६१,६७५ रुपयांच्या आसपास होता. संपूर्ण आठवड्याचा विचार करता सोन्याच्या किमतीत तब्बल ३,२७५ रुपयांची घट झाली आहे.

६ मार्च रोजी चांदीचा भाव २,६८,५७९ रुपये प्रति किलो होता. या आठवड्यात चांदीच्या दरात सुमारे ९,३३० रुपयांची मोठी घसरण नोंदवली गेली आहे.सुरक्षित गुंतवणुकीचा उत्तम पर्यायजागतिक स्तरावर जेव्हा राजकीय किंवा आर्थिक अस्थिरता निर्माण होते, तेव्हा गुंतवणूकदार सुरक्षित पर्याय म्हणून सोन्या-चांदीकडे वळतात. इराण-इस्रायल युध्दासारख्या अनिश्चित काळातही सोन्यातील गुंतवणूक आजही तितकीच विश्वासार्ह मानली जाते. मात्र, यंदा अनिश्चततेमुळे गुंतवणूकदार संभ्रमात असल्याचे दिसून येत आहे.

या आठवड्यात फेडरल बँकेचा अहवाल येणार आहे. त्याकडे अनेक गुंतवणूकदारांच्या नजरा आहेत. त्यात सकारात्मक निकाल आल्यास सोने-चांदीच्या दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.