‘फेक’ आयकर नोटिसीला बळी पडू नका… इन्कम टॅक्स विभागाचे करदात्यांना आवाहन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

करदात्यांना 2025-26 च्या बनावट असेसमेंट ऑर्डर किंवा कर मागणीच्या नोटिसा ई-मेलद्वारे पाठवल्या जात आहेत. याबाबत आयकर विभागाने करदात्यांना सावध केले आहे. अशा नोटिसा पूर्णपणे फेक असून त्याला बळी पडू नये, असे आवाहन आयकर खात्याने केले आहे. करदात्याची वैयक्तिक किंवा बँकिंग माहिती चोरणे किंवा मालवेअर सेट करणे हा यामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले आहे.

या फसवणुकीच्या ई-मेलमध्ये सामान्यतः एक लिंक दिलेली असते, ज्यावर क्लिक करण्याची सूचना दिली जाते. लिंक क्लिक केल्यावर युजरला बनावट वेबसाइटवर नेले जाते, जिथे पॅन, पासवर्ड, ध्ऊझ्, क्रेडिट कार्ड किंवा बँक खात्याचे तपशील मागितले जातात. अटॅचमेंट डाऊनलोड करण्यास सांगितले जाते.