
शिवडी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या ग्लोबल हॉस्पिटलने गेल्या 15 वर्षात गरजूंसाठी राखीव असलेल्या 37 जागापैकी एकही जागा गरजू व्यक्तीला उपलब्ध करून दिलेली नाही. याबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अजय चौधरी यांनी याबाबत दोनदा सभागृहात प्रश्न उपस्थित केला. त्याविषयी संबंधित मंत्री व अधिकाऱ्यांना पत्रव्यवहार देखील केला. मात्र सरकारने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले आहे. त्यांच्या या प्रश्नावर सरकारकडून कोणतेही उत्तर न आल्याने अजय चौधरी हे सोमवारी विधान भवनाबाहेर उपोषणाला बसले आहेत. शिवसेनेचे विधीमंडळातील गटनेते भास्कर जाधव यांनी सभागृहात ही माहिती दिली.


























































