
युद्धामुळे एकीकडे गॅस टंचाई आणि दरवाढीत सर्वसामान्य होरपळत असताना आता खाद्यतेलाचे दरही वाढल्याने पह्डणीही महागली आहे. गेल्या एकाच महिन्यात खाद्य तेलाच्या दरात प्रतिकिलो सुमारे 3 टक्क्यांपर्यंत दरवाढ झाली आहे. यामुळे गृहिणींसह हॉटेल चालकांचे बजेट कोलमडणार असून जेवण ‘महागणार’ आहे.
आखाती देशांतून येणाऱ्या इंधन पुरवठय़ावर झालेल्या परिणामाची सरकारने माहिती द्यावी, अशी मागणी आज विधान परिषदेत आमदारांकडून करण्यात आली. या वेळी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी ही माहिती दिली. सध्यस्थितीत एलपीजी किंवा इतर कुठल्याची गॅसचा तुटवडा नाही, असा दावा त्यांनी केला.
सर्वसामान्य ‘गॅस’वर
गेल्या एका महिन्यात घरगुती सिलिंडर 852.50वरून 912.50 रुपयांवर म्हणजे 60 रुपयांनी तर व्यावसायिक सिलिंडर 1720.50 रुपयांवरून 1835 रुपये म्हणजे 115 रुपयांनी महागल्याची माहिती त्यांनी दिली.
पेट्रोल कंपावर मिळणार केरोसीन
g घरगुती गॅस तुटवडय़ाची शक्यता पाहता केंद्र सरकारच्या 12 मार्चच्या आदेशानुसार केरोसीन वितरणाबाबत यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल.
g आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएलच्या पंपांवर केरोसीन उपलब्ध करण्यात येईल. यासाठी कोर्टाकडे परवानगी मागितली जाईल.
प्रतिलिटर दर
तेलाचा प्रकार 1 फेब्रुवारी 11 मार्च
शेंगदाणा 188.21 194.32
राईचे तेल 200.67 204.22
सोया तेल 153 .63 159.32
सनफ्लॉवर 172.16 178.05
वनस्पती तेल 160.47 160.63
पाम तेल 145.60 148.60




























































