
आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तयार करण्यात आलेले डीपफेक व्हिडिओ व फोटो संबंधित वेबसाईटवरून हटवण्यात यावेत या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करणाऱया शिल्पा शेट्टीला मुंबई उच्च न्यायालयाने आज दिला. तिच्याशी संबंधित डीपफेक व्हिडिओ, फोटो आणि लिंक्स 8 दिवसांच्या आत हटवण्याचे आदेश हायकोर्टाने संबंधित प्रतिवाद्यांना दिले. काही अज्ञात व्यक्ती आणि संकेतस्थळांनी संमतीशिवाय पह्टोंचा आणि आवाजाचा वापर करून आक्षेपार्ह पंटेंट तयार केल्याने प्रतिमा मलिन होत असून खासगी आयुष्यावर गदा येत असल्याचा दावा करत शिल्पा शेट्टी हिने हायकोर्टात धाव घेतली होती. न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्यासमोर या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. कोणत्याही व्यक्तीची, विशेषतः महिलेची प्रतिमा अशा प्रकारे मांडली जाऊ शकत नाही जेणेकरून तिच्या सन्मानाला धक्का बसेल असे स्पष्ट करत न्यायालयाने आक्षेपार्ह डीपफेक व्हिडिओ हटवण्याचे आदेश दिले.





























































