होमिओपॅथी डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथी व्यवसायाची परवानगी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
पर्वती-माधुरी मिसाळ

ग्रामीण भागात आवश्यक असणारे एमबीबीएस डॉक्टर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे होमिओपॅथिक (बीएचएमएस) डॉक्टरांना रुग्णांवर केवळ अ‍ॅलोपॅथी औषधोपचार करण्यासाठी आवश्यक तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यांना अ‍ॅलोपॅथीचा व्यवसाय करण्यास परवानगी देण्यात आलेली नाही, असे स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज विधानसभेत दिले.

अशी परवानगी देणे म्हणजे रुग्णांच्या आरोग्याशी खेळणे आहे. त्यामुळे त्यांना नोंदणीकृत वैद्यकीय व्यावसायिकाची नोंदणी देऊ नये, अशी मागणी आमदार डॉ. तुषार राठोड यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली होती. त्याला आमदार अतुल भोसले यांनी पाठिंबा दिला तर डॉ. संजय कुटे यांनी विरोध केला. उच्च न्यायालयाच्या अंतरिम आदेशानुसारच बीएचएमएस डॉक्टरांना अ‍ॅलोपॅथी औषधोपचार करण्यासाठी नोंदणीचे पोर्टल सुरू करण्यात आले असल्याची माहिती मिसाळ यांनी दिली.