
मुंबईतील वाढत्या वाहतूक कोंडीच्या जाचातून मुक्तता मिळण्यासाठी वांद्रे-वरळी सी लिंक सर्व वाहनांसाठी टोल फ्री करा, अशी मागणी शिवसेना आमदार सुनील शिंदे यांनी विशेष उल्लेख सूचनेद्वारे केली.
पश्चिम उपनगराला दक्षिण मुंबईशी जोडण्यासाठी वांद्रे-वरळी सी लिंक महत्त्वाचा पर्यायी मार्ग आहे. या सागरी पुलाची पायाभरणी 1999 साली हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली. या मार्गाचे उद्घाटन 30 जून 2009 रोजी करण्यात आले असून 24 मार्च 2010 पासून हा मार्ग वाहतुकीस खुला करण्यात आला. या सागरी पुलाच्या उभारणीसाठी 1684 कोटी रुपये खर्च आला असून 2024 पर्यंत टोल आकारणीमधून 1228 कोटी रुपये वसूल झाले आहेत. त्यामुळे हा मार्ग आता टोल फ्री करावा, अशी मागणी सुनील शिंदे यांनी केली.





























































