Kerala Assembly elections 2026 – काँग्रेसकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर; दिग्गज नेत्यांना पुन्हा संधी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळममध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने (Congress) ५५ उमेदवारांची पहिली अधिकृत यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये पक्षाने अनुभवी नेत्यांवर विश्वास कायम ठेवला असून अनेक विद्यमान आमदारांना पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

दिग्गज नेत्यांचा समावेश

काँग्रेसने जाहीर केलेल्या या पहिल्या यादीत प्रमुख नेत्यांची नावे निश्चित करण्यात आली आहेत. यामध्ये प्रामुख्याने सनी जोसेफ यांना त्यांच्या हक्काच्या मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे.

दरम्यान, केरळमध्ये सध्या डाव्या लोकशाही आघाडीचे (LDF) सरकार असून, सत्तांतर घडवून आणण्यासाठी काँग्रेसप्रणित संयुक्त लोकशाही आघाडीने (UDF) आक्रमक प्रचार सुरू केला आहे. केरळ विधानसभेच्या एकूण १४० जागांसाठी ही निवडणूक पार पडणार असून, काँग्रेसने पहिल्या टप्प्यात ५५ जागा जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे. उर्वरित जागांची घोषणा देखील लवकरच केली जाणार असल्याचे प्रदेश काँग्रेस कमिटीकडून सांगण्यात आले आहे.