
IPL 2026 च्या रणधुमाळीला सुरुवात होण्यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्स ताफ्यातून एक आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. 156 किमी वेगाने प्रतिस्पर्धी फलंदाजांच्या दांड्या गुल करणारा हुकुमी एक्का मयंक यादव आता पूर्णपणे फिट झाला आहे. गेल्या काही काळापासून दुखापतीशी झुंज देणारा मयंक आगामी हंगामात पुन्हा एकदा मैदानात आग ओकायला सज्ज झाला असून त्याच्या पुनरागमनामुळे लखनऊच्या गोलंदाजीची धार प्रचंड वाढली आहे.
लखनऊ सुपर जायंट्सने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून मयंकचा एक सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मयंक आपल्या जुन्या पेस आणि अचूकतेसह गोलंदाजी करताना दिसत आहे. सराव सत्रात त्याने आपल्या वेगाने सर्वांनाच प्रभावित केले. दुखापतीतून सावरल्यानंतर मयंक ज्या पद्धतीने लयबद्ध गोलंदाजी करत आहे, ते पाहता लखनऊसाठी ही ‘गुड न्यूज’ मानली जात असून प्रतिस्पर्धी संघांसाठी धोक्याची घंटा वाजली आहे.
500 comments and we will do a rematch 👀🔥 pic.twitter.com/eksHTWq8wb
— Lucknow Super Giants (@LucknowIPL) March 17, 2026
मयंक यादवच्या आतापर्यंतच्या आयपीएल कारकिर्दीवर नजर टाकली, तर त्याने आपल्या वेगाच्या जोरावर अल्पावधीतच नाव कमावले आहे. त्याने आतापर्यंत खेळलेल्या 6 सामन्यांच्या 6 डावांत 20.55 च्या सरासरीने 9 गडी बाद केले आहेत. यामध्ये 14 धावांत 3 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली असून 9.17 चा त्याचा इकॉनॉमी रेट आहे. लखनऊच्या संघाने आता आपल्या रणनीतीला अंतिम स्वरूप द्यायला सुरुवात केली असून मयंकची उपस्थिती त्यांच्यासाठी विजयाचे समीकरण ठरू शकते.



























































