मालदीवमध्ये गौतम सिंघानिया यांची स्पीडबोट उलटली, उपचारासाठी मुंबईला एअरलिफ्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेमंड ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम सिंघानिया आज मालदीवमध्ये स्पीडबोट उलटल्याने जखमी झाले आहेत. या अपघातात सिंघानिया यांना दुखापत झाली असून उपचारांसाठी एअरलिफ्ट करून त्यांना मुंबईला आणले आहे.

मालदीवमधील फेलिधू एटोलजवळ ही घटना घडली. स्पीडबोटवर एक कॅप्टन आणि गौतम सिंघानिया यांच्यासह एकूण सातजण होते. यामध्ये पाच हिंदुस्थानी, एक ब्रिटिश आणि एका रशियन नागरिकाचा समावेश होता. बचाव पथकाने सिंघानिया यांना वाचवले, परंतु हिंदुस्थानचा दिग्गज रॅली चॅम्पियन हरी सिंह आणि अन्य एक व्यक्ती बेपत्ता आहे.