
>> आशिष बनसोडे
मुंबई पोलीस आयुक्तालयातील 93 पोलीस ठाण्यांना प्रत्येकी पाच नव्या कोऱया गाडय़ा नुकत्याच देण्यात आल्या, लवकरच वाहतूक पोलिसांना स्वतःच्या 41 टोइंग क्रेन आणि 150 दुचाकी देण्यात येणार आहेत. असे असताना गुन्हे शाखा व विशेष शाखेला मात्र जुनीच वाहने वापरावी लागणार आहेत.
मुंबई पोलीस यंत्रणा दिवसेंदिवस हायटेक बनत चालली आहे. आधुनिकतेची कास धरत सर्वच स्तरांवर आवश्यक बदल करत पोलीस यंत्रणा अधिक सक्षम व आधुनिक बनविण्यावर जोर देण्यात येत आहे. त्याच धर्तीवर नुकत्याच पोलीस ठाण्यांना पाच नव्या कोऱया गाडय़ा वितरीत करण्यात आल्या. स्कॉर्पिओ आणि अरबेनिया या गाडय़ा देण्यात आल्या. त्याच वेळी जुन्या गाडय़ा जमा करून त्यांचा लिलाव करण्यात येत आहे. याशिवाय वाहतूक पोलिसांना लवकरच 41 नव्या स्वतःच्या टोइंग क्रेन आणि 150 दुचाकी देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, पंत्राटी व्रेन बाजूला करून वाहतूक पोलिसांना स्वतःच्या मालकीच्या नव्या व्रेन आता मिळणार आहेत. त्यामुळे वाहतूक पोलीसदेखील नव्या गाडय़ा वापरताना दिसणार आहेत. असे असताना गुन्हे शाखा व विशेष शाखेच्या पथकांना मात्र जुन्याच सुमो व बोलेरो वाहनांचाच आसरा घ्यावा लागणार असल्याचे चित्र आहे.
या शाखांच्या वाटय़ाला नव्या गाडय़ा अद्याप आल्या नसल्याने जुनी वाहनेच त्यांना वापरावी लागणार आहेत. सध्या तरी गुन्हे शाखा व विशेष शाखांसाठी नव्या गाडय़ा नसून भविष्यात त्यांना दिल्या जातील, एका वरिष्ठ अधिकाऱयाकडून सांगण्यात येते.
गाड्या दिल्यात त्या नीट वापरा, शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना नुकत्याच नव्या कोऱ्या चार
स्कॉर्पिओ आणि एक अरबेनिया अशा गाडय़ा दिल्या आहेत. या गाडय़ा नीट वापरा, काळजीपूर्वक हाताळा, अशा सूचना वरिष्ठ अधिकांऱयाकडून पोलीस अधिकारी, कर्मचाऱयांना देण्यात येत आहेत.
अन्यथा गाड्या काढून घेणार
गाडय़ा व्यवस्थित वापरा. कशाही वापरून गाडय़ांची वाट लागणार नाही याची काळजी घ्या. गाडय़ा नीट वापरल्या जात नसल्याचे आढळल्यास त्या संबंधित पोलीस ठाण्यातून काढून घेण्यात येतील, अशी तंबीदेखील वरिष्ठांकडून देण्यात आली आहे.

























































