
वाहन उद्योग क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल यंदाचा ‘पुण्यभूषण’ पुरस्कार ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांना जाहीर झाला आहे. डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने त्यांचे नाव निश्चित केले आहे. सीमेवर लढताना जखमी झालेल्या जवानांनाही गौरविण्यात येणार असल्याचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी सांगितले.
सलग 37 वर्षे ‘पुण्यभूषण फाउंडेशन’ने पुरस्काराचा उपक्रम राबविला आहे. पुण्याचे नाव जगभर पोहोचविणाऱया 37 ज्येष्ठ पुणेकरांना यापूर्वी गौरविण्यात आले होते.























































