
आखातातील युद्धामुळे निर्माण झालेली इंधन टंचाईची व भविष्यात येणाऱया संकटाचा सामना करण्यासाठी सात उच्चाधिकार गटांची स्थापना करण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली. हे संकट परतवून लावण्यासाठी सर्व राज्यांनी ‘टीम इंडिया’ म्हणून काम करावे, असे आवाहन मोदींनी यावेळी केले.
इराण युद्धावर पंतप्रधान मोदी यांनी आज राज्यसभेत निवेदन केले. यावेळी त्यांनी कोविड काळाची आठवण दिली. ‘कोविड संकटाच्या काळात तज्ञांच्या उच्चाधिकार गटाने वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी मोठी मदत केली होती. आता नेमलेले सात उच्चाधिकार गट गॅस, तेल व खतांची टंचाई, पुरवठा साखळी आणि महागाई नियंत्रण यावर काम करतील. या सगळय़ा समस्या हाताळण्यासाठी उपाय सुचवतील, असे मोदी म्हणाले. काळाबाजार आणि साठेबाजीला आळा घालावा,’ अशा सूचना मोदींनी केल्या.
इराणचे इस्रायलसह आखाती देशांत हल्ले
तेहरान ः इराणने मंगळवारी इस्रायलची राजधानी तेल अवीवसह आखाती देशांतील विविध ठिकाणांवर ड्रोन आणि मिसाइल डागले.



























































