Earthquake – इंडोनेशियात 7.4 रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यानंतर, त्सुनामीचा इशारा जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इंडोनेशियामध्ये गुरुवार २ एप्रिलला सकाळी पूर्व इंडोनेशियाच्या किनाऱ्याजवळ ७.४ तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप झाला. युनायटेड स्टेट्स जिओलॉजिकल सर्व्हे (USGS) ने म्हटले आहे की या भूकंपामुळे त्सुनामीचा धोका देखील निर्माण होऊ शकतो. यूएसजीएसने भूकंपाच्या केंद्रापासून १,००० किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये धोकादायक त्सुनामी लाटांचा इशारा देण्यात आलेला आहे.

यूएसजीएसनुसार, भूकंपाचे केंद्र १.२० अंश उत्तर अक्षांश आणि १२६.३५ अंश पूर्व रेखांशावर होते. यूएसजीएसने पुढे सांगितले की, हा भूकंप मोलुक्का समुद्रात स्थानिक वेळेनुसार सकाळी अंदाजे ६:४८ वाजता झाला. चायना अर्थक्वेक नेटवर्क्स सेंटरनुसार, हा भूकंप अंदाजे ३० किलोमीटर खोलीवर झाला. भूकंपाची नोंद होताच, हवाईमधील पॅसिफिक त्सुनामी वॉर्निंग सेंटरने एक सूचना जारी केली, ज्यात म्हटले आहे की भूकंपाच्या केंद्रापासून १,००० किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये धोकादायक त्सुनामी लाटा येऊ शकतात. या इशाऱ्यात इंडोनेशिया, फिलीपिन्स आणि मलेशियाच्या किनारपट्टीच्या भागांना धोकादायक क्षेत्र म्हणून सूचीबद्ध केले आहे.