मध्य रेल्वेने भंगार विक्रीतून कमावले 459 कोटी रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मध्य रेल्वेने मुंबई, भुसावळ, पुणे, सोलापूर, नागपूर या विभागात शून्य भंगार मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत प्रत्येक विभाग, कारखाना आणि कारशेडमधील भंगाराचे साहित्य गोळा करण्यात आले. याद्वारे 2025-26 या आर्थिक वर्षात भंगार विक्रीतून मध्य रेल्वेला 459.52 कोटी रुपयांपेक्षा जास्त महसूल मिळाला. रेल्वे परिसरातील, कारशेडमधील, कारखान्यातील लोह, स्टील, अॅल्युमिनियम, पितळ, तांबे व इतर धातूच्या भंगाराची विक्री केली. तसेच रेल्वे रुळाचे भाग, पडीक खांब असे वजनदार साहित्य यांचाही त्यात समावेश आहे. या धातूंच्या वस्तू व इतर भंगाराच्या साहित्याला मोठी मागणी असते.