
महापालिका निवडणुकीदरम्यान बॉम्बे असा उल्लेख करत मुंबई महाराष्ट्राचे शहर नाही तर आंतरराष्ट्रीय शहर आहे, असे वादग्रस्त विधान करणाऱ्या के. अन्नामलाई यांचे तिकीट भाजपने कापले आहे. तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने 27 उमेदवारांच्या नावाची यादी जाहीर केली. या यादीत केंद्रीय मंत्री एल. मुरुगन यांच्यापासून माजी राज्यपाल सुंदरराजन यांच्यापर्यंत अनेक जेष्ठ नेत्यांच्या नावांचा समावेश आहे. मात्र या यादीतून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष अण्णामलाई यांचे नाव मात्र वगळण्यात आले आहे. एआयएमडीएमकेसोबत असलेल्या कटू संबंधांमुळे भाजपने अन्नामलाई यांना निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर काढल्याचे समोर आले आहे. मात्र भाजपच्या या निर्णयामुळे अनेकांना मोठा धक्का बसला आहे.



























































