असं झालं तर…कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर संपत्तीचा हक्क मिळवताना…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कुटुंबप्रमुखाच्या मृत्यूनंतर त्याच्या कायदेशीर वारसांना वेळीच आणि योग्य पावले उचलली पाहिजे जेणेकरून भविष्यात मालमत्तेचा वाद टाळता येईल.

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या मालमत्ता किंवा संपत्तीचे व्यवस्थापन करावे. त्याची सुरुवात मृत्युपत्राची तपासणी किंवा कायदेशीर वारसांना ओळखण्यापासून होते.

मृत व्यक्तीने मृत्युपत्र केले आहे की नाही याची खात्री करून घ्यावी. मृत्युपत्राची कायदेशीर वैधता अधिक मजबूत करण्यासाठी प्रोबेट करून घेतलेले कधीही चांगले.

मालमत्तेचा मूळ मालक मृत्युपत्र न करता मरण पावला असेल तर कायदेशीर वारसदारांची ओळख पटवली पाहिजे आणि कायदेशीर वारस प्रमाणपत्र प्राप्त मिळवले पाहिजे.

मालमत्तेमध्ये हक्क प्राप्त झालेल्या कायदेशीर वारसांची नावे समाविष्ट करण्यासाठी  मालमत्ता पत्रक, 7/12 उतारा किंवा नगरपालिका अभिलेख अपडेट करा.