विष्णुदास भावे नाट्यगृहात घुमणार ‘गोल्डन’ सूर; १० एप्रिल रोजी २०० वा ‘गोल्डन हिट्स’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विष्णुदास भावे नाट्यगृहात शुक्रवार १० एप्रिल रोजी ‘संगीत के धुरंधर’ या संकल्पनेवर आधारित ‘गोल्डन हिट्स’ या वाद्यवृंदाचे ‘गोल्डन’ सूर घुमणार आहेत. २०० व्या कार्यक्रमात तब्बल ९ गायक विविध ढंगाची गाणी सादर करणार असून २० हून अधिक वादक कलाकार सहभागी होणार आहेत. यानिमित्ताने हिंदी चित्रपटातील जुन्या व नव्या गाण्यांची अनोखी मेजवानी रसिकांना मिळणार आहे.

ज्या विष्णुदास भावे नाट्यगृहातून ‘गोल्डन हिट्स’ या कार्यक्रमाची सुरुवात झाली त्याच वास्तुत २०० वा कार्यक्रम होणार असल्याने या मैफलीला अनोखे महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रसिद्ध गायक अजित मेस्त्री व त्यांच्या सहकाऱ्यांनी अनमोल एण्टरटेन्टमेंटच्या माध्यमातून अनेक कलाकारांना
संधी दिली आहे.

१० एप्रिल रोजी होणाऱ्या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक आलोक काटदरे, अनिल बाजपेयी, मुख्तार शाह, अजित मेस्त्री, गुल सक्सेना, श्रुती भिडे, स्वाती चौधरी, प्रणाली राजपूत आणि सचिन मुठे गाणी सादर करणार आहेत. संगीत संयोजनाची धुरा सागर-ओंकार यांच्याकडे असून कार्यक्रमाचे निवेदन संदीप कोकीळ करणार आहेत. या मैफलीच्या निमित्ताने हिंदी चित्रपटातील गाण्यांचा सुवर्णकाळ पुन्हा अवतरणार आहे.