
प्रख्यात अभिनेते आणि लेखक पीयूष मिश्रा हे सध्या आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत. ‘तुम्हारी औकात क्या है पीयूष मिश्रा’ या आत्मचरित्रामध्ये त्यांनी अनेक धक्कादायक गोष्टींचे खुलासे केले आहेत. सातवीमध्ये असताना आपण शाळेतीलच एका शिक्षिकेच्या प्रेमात पडलो होतो आणि एकांतात आम्ही एकमेकांचे चुंबनही घेतले होते. मात्र ही घटना उघड झाल्यानंतर वडिलांनी बेदम मारहाण करत मला शाळेतून काढून टाकले होते, असे पीयूष मिश्रा यांनी म्हटले. सातवीमध्ये असताना मावशीनेच आपले लैंगिक शोषण केल्याचा उल्लेखही त्यांनी पुस्तकामध्ये केला आहे. दारूच्या आहारी गेल्याने आपल्या हातून अनेक गैरकृत्य घडल्याचेही त्यांनी मान्य केले.
बालवयामध्ये आपल्यासोबत घडलेल्या घटनेने मला हादरवून सोडले होते. शरीरसंबंध ही एक नैसर्गिक आणि आरोग्यदायी गोष्ट आहे. त्यामुळे तुमचा पहिला अनुभव चांगला असणे आवश्यकत असते. अन्यथा, तो प्रसंग तुम्हाला आयुष्यभरासाठी विचलित करतो. माझ्यासोबत घडलेल्या घटनेमुळे माझ्या मनात कायमचा न्यूनगंड निर्माण झाला आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी बराच काळ जावू द्यावा लागला. ‘पीटीआय’ला दिलेल्या मुलाखतीत पीयूष मिश्रा यांनी या घटनेचा उल्लेख केला आहे.
शाळेत असताना शिक्षिकेचे चुंबण घेतले अन्…
दहावीमध्ये असताना पीयूष मिश्रा हे त्यांच्या शाळेतील ‘मिस जिंजर’ नावाच्या शिक्षिकेच्या प्रेमामध्ये पडले होते. त्या शिक्षिका मूळच्या केरळ येथील होत्या आणि दिसायलाही सुंदर होत्या. पीयूष यांच्या व्यक्तिमत्वामुळे आणि गायन कौशल्यामुळे शिक्षाकाही त्यांच्याकडे आकर्षित झाल्या होत्या. एकांतांमध्ये दोघांनी एकमेकांचे चुंबनही घेतले होते. शाळेतील एकाने ही घटना पाहिली आणि त्यानंतर ही गोष्ट वडिलांनी कळाली. त्यांनी बेदम मारहाण करत पीयूष मिश्रा यांना थेट शाळेतूनच काढून टाकले होते.
दारू पिऊन महिलांना अश्लील कॉल
पीयूष मिश्रा यांना दारूचे प्रचंड व्यसन लागले होते. दारू प्यायल्यानंतर आपण अनेक महिलांना अश्लील फोन कॉल करत होतो. सकाळी दारू उतरल्यानंतर मला हे आठवतही नसायचे. लोक याबाबत सांगायचे तेव्हा माझा त्यांच्यावर विश्वास बसत नव्हता. दारू प्यायल्यानंतर माझे वर्तनच बदलायचे. मी आईलाही शिवीगाळ करायचो. मी मुंबईत तिच्यासोबतच राहायचो, असेही पीयूष मिश्रा यांनी सांगितले. शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी याबाबत सांगितले आहे. ‘एनडीटीव्ही‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
2009 मध्ये ब्रेन स्ट्रोक
पीयूष मिश्रा मूळचे उत्तर प्रदेशमधील ग्वालियर येथील रहिवासी असून दिल्लीत असताना आपल्याला दारूचे व्यसन लागल्याचे त्यांनी कबूल केले. अनेकदा त्यांनी दारू सोडण्याचा विचार केला, पण शक्य झाले नाही. दारूमुळेच 2009 मध्ये ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाल्याचेही त्यांनी म्हटले. यामुळे त्यांच्या डाव्या भागाला लकवा मारला होता. त्यानंतर विपश्यना आणि साधनेच्या जोरावर आपण दारूचे व्यसन कमी केल्याचे पीयूष मिश्रा यांनी सांगितले.


























































