लखनऊमध्ये मशिदीवर बुलडोझर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथील अस्ती गावात एक मशीद बुलडोझरच्या मदतीने पाडण्यात आली आहे. सरकारी भूखंडावर अतिक्रमण करून ही मशीद बांधण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. अलाहाबाद उच्च न्यायालयाने याची दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार तीन बुलडोझरच्या मदतीने पहाटे 3 वाजता ही मशीद जमीनदोस्त करण्यात आली.