मिठी नदीतील गाळ काढण्यास सुरुवात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईतील नाले आणि नद्या स्वच्छतेची कामे विहित वेळेत पूर्ण करण्यासाठी मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून सूक्ष्म नियोजनावर भर दिला जात आहे. या अनुषंगाने मुंबई महानगरातील लहान व मोठया नाल्यांसह मिठी नदीमधून गाळ काढण्याची कामे सुरू करण्यात आली आहेत. पालिकेकडून 12 मार्च पासून गाळ काढण्याची कामे हाती घेण्यात आली असून पालिकेचे अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजीत बांगर यांनी मिठी नदी व पूर्व उपनगरांमध्ये सुरू असलेल्या नालेस्वच्छता कामांची पाहणी केली. मिठी नदीवर सुरू असलेल्या तीन पॅकेज अंतर्गत पाच ठिकाणी कामांची सुरुवात झाली आहे. त्यापैकी तीन ठिकाणी (कनेक्टर ब्रिज, वांद्रे-कुर्ला संकुल परिसरातील एमएमआरडीए कार्यालय (जेतवन उद्यान) आणि अंबानी शाळालगत बांगर यांनी भेट दिली.