
उन्हाळी सुट्टीत चाकरमान्यांची वाढती मागणी लक्षात घेत मध्य रेल्वे कोकणासाठी 4 अतिरिक्त एसी विशेष ट्रेन सुरू करणार आहे. या गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई (CSMT) ते मडगाव दरम्यान धावतील. अतिरिक्त ट्रेनमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरम्यान्यांना दिलासा मिळणार आहे.
सीएसएमटी-मडगाव-सीएसएमटी गाडी क्रमांक 01129 एसी विशेष 10 एप्रिल 2026 आणि 14 एप्रिल 2026 रोजी सीएसएमटी येथून 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 15:15 वाजता मडगावला पोहोचेल.
गाडी क्रमांक 01130 एसी विशेष 10 एप्रिल 2026 आणि 14 एप्रिल 2026 रोजी मडगाव येथून 16:00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 03:45 वाजता सीएसएमटी येथे पोहोचेल.
या सर्व गाड्यांना दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम रोड या ठिकाणी थांबे देण्यात येतील.





























































