
हिंदुस्थानने सेशेल्सला 250 मेट्रिक टन अन्नधान्याची खेप पाठवली आहे. हे अन्नधान्य परराष्ट्र मंत्रालयाने 175 दशलक्ष डॉलरच्या विशेष आर्थिक पॅकेज अंतर्गत पाठवले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवत्ते रणधीर जयस्वाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही माहिती दिली. हिंदुस्थानने घोषित केलेल्या 175 दशलक्ष डॉलरच्या विशेष आर्थिक पॅकेजमध्ये 125 दशलक्ष डॉलरची व्रेडिट लाइन आणि 50 दशलक्ष डॉलरची मदत समाविष्ट आहे. सेशेल्स हे आयातीवर अवलंबून असलेले एक छोटे बेट आहे. भारत-सेशेल्सदरम्यानचे राजनैतिक संबंध 1976 पासून आहेत.



























































