
हिंदुस्थानात केटीएमच्या बाइक्स खरेदी करणे महाग झाले आहे. केटीएम 390 रेंजच्या किमतीत कंपनीने वाढ केली आहे. कंपनीने 390 एडवेंचर एक्स आणि 390 डय़ूकच्या किमतीत 40 हजारांची वाढ केली आहे. गेल्या वर्षी जीएसटीमध्ये झालेल्या बदलामुळे बाइक्सच्या किमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. केटीएम एडवेंचर एक्सची किंमत आता 3.43 लाख रुपये एक्स शोरूम झाली आहे. ही बाइक आधी 3.26 लाख रुपयांत येत होती. केटीएम 390 डय़ूकची किंमत 2.99 लाख रुपये होती ही बाइक आता 3.39 लाख रुपयांपर्यंत पोहोचली आहे. 250 डय़ूक आणि 390 डय़ूकच्या किमतीत आता 1.22 लाखांचा फरक आहे.

























































