शालेय मुलांसाठी आयडियलचे कबड्डी स्पर्धात्मक उन्हाळी शिबीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयडियल स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीच्या वतीने उन्हाळी सुट्टीमध्ये शालेय मुलांसाठी कबड्डी स्पर्धात्मक प्रशिक्षण शिबीर मुंबई शहर व उपनगरमधील विविध विभागांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. सदर पूर्णपणे मोफत कबड्डी उपक्रमाचा शुभारंभ कुर्ला-पश्चिम येथील गांधी मैदानात 25 एप्रिलपासून होईल. नवोदित खेळाडूंना तंत्रशुद्ध कबड्डी खेळाची प्राथमिक ओळख करून देत दुखापतीच्या भयाचे निराकरण करण्याचादेखील उद्देश आहे. माजी कबड्डीपटू गोविंदराव मोहिते, बीपीएड क्रीडा शिक्षक अविनाश महाडिक, एनआयएस कबड्डी प्रशिक्षक माधवी कदम व प्रॉमीस सैतवडेकर, कबड्डी मार्गदर्शक सुनील खोपकर, शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण आदींचे शालेय खेळाडूंना मार्गदर्शन लाभणार आहे. सदर शिबिरात निवड झालेल्या खेळाडूंना जास्तीत जास्त स्पर्धात्मक सराव देण्यात येणार असून होणाऱया चुकांचे परिमार्जनदेखील करण्यात येणार आहे. उदयोन्मुख खेळाडूंचे संघ तयार करून विभागवार एकदिवसीय कबड्डी सामने उन्हाळी सुट्टीत खेळविले जाणार आहेत.