बंगळुरूला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, मुंबईला वळवले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बंगळुरूला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने विमान मुंबईला माघारी वळवण्यात आले. विमानाचे सुखरुप लँडिंग केल्यानंतर तपासणी करण्यात आली. एअरलाईन्स कंपनीने घटनेला दुजोरा देत प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रवाशांसाठी पर्यायी विमानाची व्यवस्था करण्यात आली.

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, एअर इंडियाचे AI2812 या विमानाने गुरुवारी रात्री नियोजित वेळेत बंगळुरूसाठी उड्डाण केले. उड्डाणानंतर काही वेळातच विमानात तांत्रिक बिघाड झाल्याचा संशय आल्याने विमान पुन्हा मुंबई विमानतळावर माघारी वळवण्यात आले. एअर इंडियाने अधिकृत निवेदन जारी करत याची पुष्टी केली आहे.