भविष्य निधी कर्मचारी संघटनेवर स्थानीय लोकाधिकार समितीचा भगवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भविष्य निधी कर्मचारी संघटनेवर स्थानीय लोकाधिकार समितीचा भगवा झेंडा डौलाने फडकला आहे. महाराष्ट्रातील सर्व कार्यालयात लोकाधिकार समितीच्या शिलेदारांचा दणदणीत विजय झाला आहे.

शिवसेना नेते – खासदार आणि संघटनेचे अध्यक्ष अनिल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच भविष्य निधी समितीचे सरचिटणीस राकेश आचार्य यांच्या नेतृत्वाखाली लोकाधिकार समितीच्या शिलेदारांनी घवघवीत यश मिळवले आहे. सरचिटणीस पदी विजय ठाकरे यांनी इतर 4 उमेदवाराचा दारुण पराभव करून पुन्हा एकदा बाजी मारली आहे. अनिकेत लोणकर (वांद्रे), हर्षवर्धन जाधव (दादर), अविनाश गर्ग (कांदिवली), मनोज कुमार (ठाणे), महेश सिन्हा (पुणे), दिनेश शेलार (आकुर्डी), सुनील गोरे (नाशिक), विनोद येन्नेवार (नागपूर), रोहीत वासनकर (अकोला) आणि सोलापूरातून विशाखा आठल्ये हे बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच महादेव प्रसाद (वाशी), रमेश पवार (छत्रपती संभाजीनगर, नगर) आणि मुकेश चव्हाण कोल्हापूर येथून सचिव पदी निवडून आले आहेत.

निवडणूक प्रक्रियेत भविष्य निधी समितीचे अध्यक्ष सुभाष भेलोसे, महासंघाचे सचिव विजय कदम तसेच अर्चना खोपटकर, किशोर केदारी, उल्हास सावंत, अभय कुमार, आलोक कुमार, पराग सुर्वे, विश्वास कलंत्रे, मृत्युंजय मिश्रा, वामन कोतवाल, सुभाष राऊत, विजय प्रकाश, सुनंदा मुळुक, रेवती नाईक, सुरेश अनाडे, सचिन फडतरे, दत्ता मसुरकर आणि इतर पदाधिकाऱयांनी विजयात मोलाचा वाटा उचलला.