
सर्वसाधारणपणे कुणीही पोलीस स्टेशनकडे फिरकत नाही. मात्र एका अस्वलाने चक्क पोलीस ठाण्याची पायरी चढण्याचं धाडस दाखवले आहे. आता प्रश्न हा आहे की हे अस्वल नेमकं कशासाठी पोलीस ठाण्यात पोहोचलं असेल? अशी गमतीशीर चर्चा सध्या सुरू आहे. पण अस्वलाने पोलीस ठाण्यात जाऊन एक फेरी मारल्याची घटना समोर आली आहे.
तक्रार की इन्स्पेक्शन ? पोलीस ठाण्यात घुसलं अस्वल, अधिकारी-कर्मचाऱ्यांची पळापळ #Maharashtra pic.twitter.com/H4wKrR13xl
— Saamana (@SaamanaOnline) July 4, 2024
ही घटना घडली आहे लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी पोलीस ठाण्यात. रात्रीच्या वेळी जंगलातून भटकत भटकत एक अस्वल दिघोरी मोठी पोलीस ठाण्यात पोहचले आणि अस्वल, पाहून अधिकारी, कर्मचारी चांगलेच घाबरले त्यांची एकच पळापळ झाली. अखेर काही काळानंतर अस्वलाने जंगलाच्या दिशेने पळ काढला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. जिल्ह्यात अशी घटना पहिल्यांदच घडली आहे.