
1993 मध्ये अवघ्या 10 वर्षांचा असलेल्या एका मुलाने AI.com नावाचा वेबसाईट डोमेन खरेदी केला होता. त्यावेळी हा एक अत्यंत साधारण इंटरनेट डोमेन होते. त्यावेळी एआय काय आहे हे कोणाला माहितीदेखील नव्हते. तसेच सोशल मीडिया नव्हता. चॅटबॉट्स नव्हते. त्यावेळी या दोन अक्षराच्या डोमेनची किंमतदेखील फार नगण्य होती. त्याने अगदी 300 रुपयांना हा डोमेन खरेदी केला होता. मात्र आज हाच AI.com डोमेन जवळपास 70 मिलियन डॉलरमध्ये म्हणजे जवळपास 600 कोटी रुपयांना विकला गेला
ही जगातील आतापर्यंतची सर्वात मोठी डोमेन डील आहे. अरस्यान इस्माईल नावाच्या व्यक्तीने हा AI.com डोमेन खरेदी केला होता. तो मलेशियामधील एक टेक व्यावसायिक आहे. 1993 मध्ये ज्यावेळी इंटरनेट नवीन होतं त्यावेळी त्यांनी फक्त एक गंमत म्हणून हा डोमेन रजिस्टर केला होता. त्यावेळी त्यांना एआय हे दोन शब्द भविष्यात एवढे मौल्यवान होतील असं कोणाला वाटलं नव्हते.
मधल्या काळात AI.com हे डोमेन अनेक वेळा लीजवर देण्यात आले होते. वेगवेगळ्या कंपन्यांनी हा डोमेन काही काळासाठी वापरला, मात्र डोमेनची खरी मालकी ही अरस्यान इस्माईलकडेच होती.
2025 मध्ये आला मोठा ट्विस्ट
2025 मध्ये एक मोठा ट्विस्ट आला होता. AI.com हे डोमेन काही काळ त्यांच्या नियंत्रणाच्या बाहेर गेले होते. मिळालेल्या माहितीनुसार डोमेनवरील नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांना पुन्हा 10 मिलियन डॉलर्स भरावे लागले होते. म्हणजे जवळपास 80 कोटी रुपये देऊन त्यांनी या डोमेनची मालकी पुन्हा मिळवली होती. त्यावेळी एआय जगभरातील एक हॉट ट्रेंड झाला होता. त्यांना माहिती होते की, पुढे याची किंमत अजून वाढणार आहे. त्यामुळेच त्यांनी 300 रुपयांमध्ये खरेदी केलेल्या डोमेनची पुन्हा मालकी मिळवण्यासाठी 80 कोटी रुपये खर्च केले होते.
अरस्यान इस्माईल यांनी AI.com डोमेन पुन्हा खरेदी केल्यानंतर काही काळ आपल्याजवळच ठेवलं. त्यानंतर त्यांनी 2026 मध्ये हे डोमेन त्यांनी क्रिप्टो डॉट कॉमच्या सीईओंना जवळपास 70 मिलियन डॉलरमध्ये विकले.



























































