गुजरातमध्ये उभारणार नवे एअरबेस; 4500 एकर जमीन उपलब्ध, पाकिस्तानपासून 130 किमी अंतरावर

4500 एकर जमीन उपलब्ध, पाकिस्तानपासून 130 किमी अंतरावर गुजरातच्या बनासकांठा जिह्यात हिंदुस्थानी हवाई दलाचे नवीन एअरबेस (स्टेशन) उभारले जाणार आहे. हिंदुस्थानी संरक्षण मंत्रालयाने दिशा एअरबसवरील उपलब्ध धावपट्टीचे नुकतेच सर्वेक्षण केले आहे. या नव्या एअरबससाठी 4500 एकर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी एक हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी तयारी केली जात आहे. तसेच 394 कोटी रुपये खर्च करून ही धावपट्टी बांधली जाणार आहे.

हिंदुस्थानी संरक्षण मंत्रालयाने या सर्वेक्षणाचे काम सिंगापूरच्या एका खासगी कंपनीकडे सोपवले आहे. याच अंतर्गत सिंगापूरहून डीए-62 प्रकारचे छोटे विमान अहमदाबाद विमानतळावर पोहोचले आहे. सुरक्षाविषयक कॅबिनेट समितीने मार्च 2018 मध्ये या योजनेला मंजुरी दिली होती.

कच्छ, अहमदाबाद, वडोदराला फायदा

गुजरातमध्ये बांधण्यात येत असलेल्या नव्या एअरबसमुळे या ठिकाणी अनेक नव्या संधी निर्माण होतील. कच्छमधील आजूबाजूच्या परिसरात आर्थिक समृद्धी येईल. अहमदाबाद, वडोदराला हवाई सुरक्षा मिळेल. डीसा एअरबेसच्या निर्मितीमुळे भारतीय हवाई दलाची क्षमता पाकिस्तानच्या मीरपूर खास आणि जेकबाबादच्या क्षमतेच्या तुलनेत अनेक पटींनी वाढणार आहे.