पुण्यात शिंदे गटात उमेदवारीवरून राडा, निवडणूक कार्यालयाबाहेर तमाशा

महापालिका निकडणुकीच्या रणधुमाळीत सत्तेसाठीची हाक किती टोकाला जाऊ शकते, याचा धक्कादायक नमुना पुण्यात पाहायला मिळाला. धनकवडी–सहकार नगर परिसरातील प्रभाग क्रमांक 36 (अ) मध्ये शिंदे गटामधील अंतर्गत वाद थेट अशा पातळीकर पोहोचला की, एका इच्छुक उमेदकाराने प्रतिस्पर्ध्याचा अधिकृत एबी फॉर्म  फाडून तो चक्क तोंडात टाकून गिळून टाकला. या प्रकारामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाबाहेर एकच खळबळ उडाली. राजकीय वर्तुळात संतापाची लाट पसरली आहे.

भाजपने युतीची बोलणे सुरू ठेवत शिंदे गटाला झुलवत ठेवले. एकीककडे युतीची चर्चा करत असताना दुसरीकडे भाजपने गुपचूप त्यांच्या उमेदवारांना एबी फॉर्म वाटले. शिंदे गटाला उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवसापर्यंत युतीचा पत्ता नव्हता. अखेर सर्वच जागावर भाजप अर्ज भरत असल्याचे समजल्यानंतर शिंदे गट सैरभैर झाला. शिंदे गटाला काहीच सुचत नव्हते. त्यांनी मागेल त्याला एबी फॉर्मचे वाटप सुरू केले. त्यातून त्यांच्यात वाद, रडारड, बंडाली माजली.

प्रभाग क्रमांक 36 (अ) साठी शिंदे गटाकडून मच्छिंद्र ढवळे आणि उद्धव कांबळे या दोघांना एबी फॉर्म देण्यात आला. एकच एबी फॉर्मचा अर्ज ग्राह्य धरला जाणार होत. त्यामुळे कांबळे यांनी ढवळे यांचा एबी फॉर्म फाडून गिळल्याने कांबळे यांचा अधिकृत उमेदवारीचा पत्ता कट झाला. यावरून जोरदार वाद झाला. ऐन उमेदवारी अर्ज भरण्याच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. दोन गटांतील समर्थक आमनेसामने आले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. सरकारी कामात अडथळा आणणे आणि गोंधळ घालणे या आरोपाखाली उद्धव कांबळे यांना ताब्यात घेण्यात आले.

शिंदे गटात नियोजनशून्य कारभार चव्हाटय़ावर

एकाच जागेसाठी दोन उमेदकारांना अधिकृत पत्र देणे, ही शिंदे गटातील नियोजनशून्यतेची पाकती आहे. शिंदे गटाच्या एका महिला इच्छुक उमेदकाराने अधिकृत उमेदकारी देत एबी फॉर्म दिला होता, पण माझा एबी फॉर्म दुसऱयाने पळकून नेला, असा आरोप महिलेने केला होता. प्रभाग 3 मधून इच्छुक उमेदकार पद्मा शेळके यांनी संबंधित आरोप केला होता. या घटनेमुळे शिंदे गटाचा कारभार चव्हाटय़ावर आला आहे.