हिरे-माणकापेक्षाही महाग 37 कोटींचा दगड 

सोनेचांदीच्या दरांहून अधिक महागडय़ा अशा दगडाचा लिलाव सुरू आहे. सोने-चांदी तर सोडाच, पण पाचू आणि हिऱ्यापेक्षाही हा दगड महाग आहे. मंगळ ग्रहावरून हा दुर्मिळ दगड आणण्यात आला आहे. याचा लिलाव सोथेबायज ऑक्शन   हाऊसकडून करण्यात आला आहे. सुरुवातीला दगडाची बोली 2-3 मिलियन डॉलर लावली जात होती. शेवटी 4.3 मिलियन डॉलर जवळपास 37 कोटींपर्यंत या दगडाची बोली लावण्यात आली. मंगळ ग्रहाचा पृष्ठभाग, इतिहास, तिथली सजीवसृष्टी यांच्या संशोधनासाठी वैज्ञानिकांकडून याचा वापर केला जातो.