लालबाग, भायखळा, वरळी,  शिवडीत आदित्य आणि अमित ठाकरेंचा झंझावात; रोड शो, बाईक रॅलीला उदंड प्रतिसाद

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी लालबाग, भायखळा, प्रभादेवी, वरळी आणि शिवडीत रोड शो आणि बाईक रॅलीत सहभागी होत मतदारांशी संवाद साधला. या रोड शो आणि बाईक रॅलीत हजारोच्या मतदारांनी युतीला पाठिंबा दिला.

भायखळय़ात शिवसेना, मनसे आणि राष्ट्रवादी युतीच्या प्रभाग 210 उमेदवार सोनम जामसुतकर तर वरळीत युतीच्या उमेदवार शिवसेनेच्या हेमांगी वरळीकर यांच्या प्रचारार्थ यांच्या प्रचारामध्ये आदित्य आणि अमित ठाकरे यांनी सहभाग घेतला. भेट दिली. यावेळी शर्मिला ठाकरे उपस्थित होत्या.

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी मंगळवारी हुतात्मा स्मारकाला अभिवादन केले. यावेळी शिवसेना नेते अरविंद सावंत, उपनेते साईनाथ दुर्गे, विभागप्रमुख संतोश शिंदे आदी उपस्थित होते.

केवळ मतांसाठी सत्ताधारी पक्षाकडून मतदारांना खोटी आश्वासने दिली जात आहेत, मात्र सरकारने कितीही प्रयत्न केला तरी त्यांच्या खोटय़ा आश्वासनांना भुलू नका, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. सत्तेसाठी ते एमआयएम, काँग्रेससोबत गेले. संघमुक्त भारत अशी घोषणा करणाऱया नितीशकुमार यांना मुख्यमंत्रीपदी बसवले, असा घणाघाती आरोपही त्यांनी यावेळी केला.

शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रभाग क्रमांक 158 च्या उमेदवार चित्रा सांगळे यांच्या निवडणूक कार्यालयाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी तेजस ठाकरे, शिवसेना सचिव आमदार मिलिंद नार्वेकर, विभागप्रमुख सोमनाथ सांगळे तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते. प्रभाग क्र. 169च्या उमेदवार प्रवीणा मोरजकर यांच्या कार्यालयालाही उद्धव ठाकरे यांनी भेट दिली.  

प्रभाग क्रमांक 2 मधील शिवसेना-मनसे-राष्ट्रवादी काँग्रेस युतीच्या उमेदवार धनश्री कोलगे यांच्या प्रचारात सहभागी होऊन रश्मी ठाकरे यांनी कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला. याप्रसंगी शिवसेना उपनेते विनोद घोसाळकर, उपनेत्या-खासदार प्रियंका चतुर्वेदी, माजी आमदार विलास पोतनीस, विभागप्रमुख उदेश पाटेकर, शुभदा शिंदे, सुजाता शिंगाडे, कर्णी अमीन, शाखाप्रमुख उत्तम परब, दीपाली आवारी, शशी मोरे, सोनाली विचारे, विधानसभा प्रमुख श्वेता बोराडे आदी उपस्थित होते.