Photo – आदित्य ठाकरे यांनी पुण्यात नागरिकांशी साधला संवाद

फोटो - दत्तात्रय आढाळगे

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज (20 डिसेंबर 2025) पुण्यातील लोकमान्य नगरमधील नागरिकांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

(फोटो – दत्तात्रय आढाळगे)

तुम्ही काळजी करू नका, आम्ही भक्कमपणे तुमच्या सोबत आहोत. जिथे जिथे अन्याय होतो, त्या अन्यायाच्या विरोधात आपण लढायचे आहे. इथे राजकीय विचारसरणी महत्त्वाची नाही.

जेव्हा आपले घर हातातून निघून जाते, तेव्हा आपण कोणाला मतदान केले आहे, कोणासाठी आंदोलन केले, हे बुलडोझर बघत नाही. त्यामुळे आता आपल्याला एकी दाखवायची आहे.

पूर्वी म्हटले जायचे सब भूमी गोपाल की तसे आता महाराष्ट्रात सब भूमी अदानी की हेच चालू आहे. निवडणुका असतात तेव्हा सगळे राजकीय पक्ष आपल्या दारोदारी येतात. निवडणूक संपली की सगळे बिल्डरांच्या दारी जातात.

कोणी आपल्याला ओळख पण दाखवत नाहीत. या अधिवेशनात लोकमान्य नगरचा विषय मांडला आहे, पुढील अधिवेशनातही मांडू.

परंतु त्यांनी बुलडोझर तुमच्या घरावर आणला तर पहिले आम्ही तिथे समोर उभे राहू. तुमच्या आणि बुलडोझरच्यामध्ये आम्ही उभे राहू, अशी ग्वाही आदित्य ठाकरे यांनी लोकमान्य नगरमधील रहिवाशांना दिली.