
अखंड हिंदुस्थानचे लाडके नेते, हिंदुत्वाचा धगधगता अंगार, मराठी मनाचे मानबिंदू हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष आज, 23 जानेवारीपासून सुरू होत आहे. या निमित्ताने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या लहानपणीचा त्यांच्या आजोबांसोबतचा म्हणजेच बाळासाहेबांसोबतचा फोटो शेअर करत त्यांना अभिवादन केले आहे. या पोस्टसोबत त्यांनी ”आजा, तुझा आशीर्वाद हिच माझी ताकद, हिच माझी ऊर्जा!” अशी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
आजा,
तुझा आशीर्वाद
हिच माझी ताकद,
हिच माझी ऊर्जा! pic.twitter.com/KYyhJYXRGm— Aaditya Thackeray (@AUThackeray) January 22, 2026
‘शिवसेना’ नावाचा चार अक्षरी मंत्र देऊन कोटय़वधी मनात मराठी अस्मितेचा आणि ज्वलंत हिंदुत्वाचा अंगार फुलवणारे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष तमाम शिवसैनिक आणि मराठीजनांसाठी उत्सवी वर्ष आहे.

























































