कोंडीत अडकलेल्यांना सरकार मदत करू शकत नाही! आदित्य ठाकरे यांचा घणाघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर 24 तासांपेक्षा जास्त काळ वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांना सरकार मदत करू शकत नाही ही अत्यंत विचित्र गोष्ट आहे, अशा शब्दांत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी टीका केली.

विकास आणि सुशासनाच्या सगळ्या गप्पा मारल्या जातात. अशा स्थितीत वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांना काही अंतरावर खाण्यापिण्याची व्यवस्था, टॉयलेटसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून मदत केली जाऊ शकली असती. कोंडीत अडकलेल्या लोकांची दयनीय अवस्था पाहिली. त्यांना असहायतेने भीषण परिस्थितीला सामोरे जावे लागले, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी नागरिकांप्रती सहानुभूती व्यक्त केली. नागरिकांच्या झालेल्या गैरसोयीबाबत महामार्गाच्या देखभाल आणि संचालनाची जबाबदारी असलेल्या टोलचालकांकडून पैसे वसूल केले पाहिजेत की नाही? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.