गोंदियातील आमगाव, सालेकसामध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची हजेरी; अनेक घरावरील छत उडाले

गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव व सालेकसा तालुक्यात सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. आमगाव तालुक्यातील जामखारी येथे वादळामुळे घरावरील छत उडाल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.

सायंकाळच्या सुमारास आकाशात अचानक ढग दाटून आले आणि काही क्षणात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. जवळपास 10 ते 15 मिनिटे सुरु असलेल्या वादळामुळे मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्या तर रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. या पावसाने अनेकांचे नुकसान झाले आहे.